महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सोनाक्षी सिन्हा झाली बेबी बेदी, जाणून घ्या का बदललं नाव - sex clinic

ट्विटर अकाऊंटमधील सोनाक्षी हे नाव हटकून तिने त्याठिकाणी बेबी बेदी हे नाव दिलं आहे. इतकंच नाही तर नवा प्रोफाईल फोटोही तिनं अपलोड केला आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, की स्वतःच नाव बदलण्याची वेळ सोनाक्षीवर का बरं आली?

सोनाक्षी सिन्हा झाली बेबी बेदी

By

Published : Jun 23, 2019, 5:59 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं आपल्या ट्विटर अकाऊंटचं नाव बदललं आहे. होय, आपल्या ट्विटर अकाऊंटमधील सोनाक्षी हे नाव हटवून तिने त्याठिकाणी बेबी बेदी हे नाव दिलं आहे. इतकंच नाही तर नवा प्रोफाईल फोटोही तिनं अपलोड केला आहे.

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, की स्वतःच नाव बदलण्याची वेळ सोनाक्षीवर का बरं आली? तर याचं कारण आहे तिचा आगामी सिनेमा. सोनाक्षी आपल्या आगामी 'खानदानी शफाखाना' चित्रपटात बेबी बेदी नावाचं पात्र साकारणार आहे. याच पात्राचं नाव तिनं आपल्या ट्विटर अकाऊंटला दिलं आहे. यासोबतच चित्रपटातील एक फोटो तिने आपल्या प्रोफाईलला ठेवला आहे.

सोनाक्षी सिन्हा झाली बेबी बेदी

शुक्रवारीच सोनाक्षीच्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात सोनाक्षीशिवाय वरूण शर्मा, गायक बादशाह आणि अनू कपूर हेदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. शिल्पी दासगुप्ता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या २६ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान याशिवाय सोनाक्षी सध्या आपल्या आगामी 'दबंग ३'च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. यात ती रज्जो नावाचं पात्र साकारत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details