'दृष्यम' चित्रपटातील अभिनेत्री श्रिया सरनने एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, ती 2020 मध्येच एका मुलीची आई बनली आहे. श्रियाने पहिल्यांदाच मुलीच्या जन्माविषयी माहिती दिली आहे. तिने 2018 मध्ये रशियन बॉयफ्रेंड आंद्रेई कोस्चीवशी लग्न केले होते. या वर्षी ऑगस्टमध्ये ती स्पेनमधून भारतात परतली, तेव्हापासून तिच्या गर्भधारणेच्या अफवा पसरल्या होत्या. आपल्या पोस्टद्वारे श्रियाने या अफवांना ब्रेक लावला आहे.
व्हिडिओ शेअर करुन दिली मुलीच्या जन्माची बातमी
श्रियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती पती आणि मुलीसोबत दिसत आहे. या जोडप्याने त्यांच्या आयुष्याच्या या नव्या टप्प्याचा उल्लेख केला आहे. श्रिया लिहिते, 'नमस्कार मित्रांनो, आम्ही खूप क्रेझी होतो, परंतु 2020 चे क्वारंटाईनचा काळ आमच्यासाठी संस्मरणीय होता. संपूर्ण जग गोंधळात असताना, आमचे जग पूर्णपणे बदलले होते. आमचे जग साहस, उत्साह आणि शिकण्याने भरलेले होते. एक देवदूत आमच्या जगात आला. यासाठी आम्ही देवाचे आभार मानतो.
स्पेनमध्ये घालवला लॉकडाऊनचा काळ