मुंबई - बॉलिवूडमध्ये आपल्या पॉवर पॅक्ड अॅक्शन आणि धोकादायक स्टंटने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता टायगर श्रॉफ बुधवारी (2 मार्च) आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याचे चाहते त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा देत आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त टायगर सोशल मीडियावरही त्याच्या चाहत्यांशी संपर्कात असतो. तो दररोज त्याच्या अॅक्शन आणि स्टंटचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आता त्याने आपल्या अॅक्शन-स्टंटचा असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे, जो पाहून त्याच्या चाहत्यांची तारांबळ उडाली आहे.
टायगर श्रॉफने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो वाळूमध्ये कार्डविले शर्टलेस करताना दिसत आहे. विशेष म्हणजे टायगर एका दमात बॅक जंप करताना दिसत आहे. टायगर त्याच्या ट्रेनरसोबत ही बॅक जंप करत आहे.
टायगरचा हा व्हिडिओ पाहून अभिनेत्याच्या चाहत्यांचे डोके चक्रावते आहे. यासोबतच फिल्म सेलेब्सही यावर भाष्य करत आहेत. टायगरच्या या व्हिडिओवर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 'उफ' कमेंट केली आहे.