महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अभिनेता शेखर सुमन साजरा करणार नाहीत वाढदिवस, कारण... - latest bollywood news

आपण आपला जन्मदिवस साजरा करणार नसल्याचे अभिनेता शेखर सुमन यांनी यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटही केले आहे.

शेखर सुमन
शेखर सुमन

By

Published : Dec 6, 2020, 3:18 PM IST

मुंबई -सुशांतसिंह राजपूतच्या सन्मानार्थ आपण आपला जन्मदिवस साजरा करणार नसल्याचे अभिनेता शेखर सुमन यांनी यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे.

ते म्हणाले, की मी सध्या वाढदिवस साजरा करण्याच्या मनस्थितीत नाही. एवढीच आशा करू शकतो, की त्याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर ताब्यात घेतले जावे, आणि या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागावा. मला भेटणारे बरेच लोक मला विचारत असतात, की सुशांतच्या बाबतीत काय झाले. मला या प्रश्नाचे उत्तर मिळावे अशी इच्छा आहे. आपण फक्त आशा आणि प्रार्थना करू शकता, की एक दिवस चमत्कार होईल.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत 14 जून रोजी त्याच्या मुंबईस्थित अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो आणि अंमलबजावणी संचालनालय तसेच केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) त्याच्या मृत्यूची चौकशी करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details