मुंबई -सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. अभिनेत्याच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला आहे. सुशांतचे चाहतेदेखील सोशल मीडियावर बॉलिवूडच्या अनेक स्टार्सना लक्ष्य करीत आहेत आणि सुशांतच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशीची मागणी करत आहेत. दरम्यान अभिनेता शेखर सुमन आणि अभिनेत्री रुपा गांगुली यांनी बॉलिवूड स्टार्सवर जोरदार निशाणा साधला आहे. गांगुली यांनीही या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
शेखर यांनी ट्वीट केले की, ''फिल्म इंडस्ट्रीतील सर्व सिंह सुशांतच्या चाहत्यांच्या उद्रेकापुढे उंदिर बनून बिळात लपले आहेत. ्त्यांचे मुखवटे गळून पडले आहेत. हिप्पोक्रेट्स उघडकीस आले आहेत. दोषींना शिक्षा होईपर्यंत बिहार आणि हा देश शांत बसणार नाही. बिहार जिंदाबाद.''
शेखर यांना असा विश्वास आहे की सुशांतने खरोखर आत्महत्या केली असती तर त्याने सुसाइड नोट लिहिली असती. शेखर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय , ''हे अगदी स्पष्ट आहे की, सुशांतसिंग राजपूत यांनी आत्महत्या केली असली तर त्याच्यासारखा दृढ आणि हुशार माणूसाने सुसाइड नोट सोडली असती. बर्याच लोकांप्रमाणेच माझे हृदय म्हणतंय की दिसते त्याहून हे प्रकरण गंभीर आहे.''
हेही वाचा - ...तर तो व्हीडिओ सोशल मीडियावर टाकेन, सोनू निगमची भूषण कुमारला धमकी
त्यांनी दुसर्या ट्वीटमध्ये लिहिले की, ''सुशांत बिहारी होता, म्हणूनच बिहारी सेंटीमेंट सर्वाधिक आहे. पण सुशांतच्या या आत्महत्येला भारतातील सर्व राज्यातील लोकांनी त्रास दिला आहे यात शंका नाही आणि आणखी एक गोष्ट अशी आहे की स्वतःच्या पायावर इंडस्ट्रीत आलेल्या दुसऱ्या कोणावरही असा प्रसंग येता कामा नये.''
शेखर यांनी असेही म्हटले आहे की ते एक मंच तयार करीत आहेत आणि या फोरमच्या मदतीने ते सरकारवर दबाव आणतील की, सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत व्हायला हवी. शेखरशिवाय 'महाभारत'मध्ये द्रौपदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपा गांगुली यांनीही सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. या अभिनेत्रीने तिच्या ट्विटर हँडलवरून सतत पोस्टही शेअर केल्या आहेत.
रूपाने आपल्या ट्विटर हँडलवरून सुशांतचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, # #CBIForSushant '. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही त्यांनी आपल्या पोस्टवर टॅग केले. अभिनेत्रीने लिहिले आहे की, "तपास लवकर चालू आहे का? आणि 15 जूनला फॉरेन्सिक टीम तिथे का पोहोचली?"
यानंतर अभिनेत्रीने सतत ट्वीट केले आणि लिहिले की, "शवविच्छेदन करताना शरीरात कोणत्याही विषारी पदार्थाचा पुरावा आढळला होता का? घरात कोणीच घुसलं नाही हे तपासण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज पाहिलं होतं का? तिथे सुसाईड नोट सापडली नसताना पोलिसांनी आत्महत्या कशी घोषित केली?"
यापूर्वी सोनू निगम, सोना महापात्रा यांच्यासह इतरही अनेक सेलेब्रिटींनी सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांनी 14 जून 2020 रोजी मुंबईच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून घेतला होता. सुशांतने इतके मोठे पाऊल का उचलले याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. यासाठी पोलीस सुशांतच्या जवळच्या लोकांजवळही चौकशी करत आहेत.