महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आत्म-शोधाची हृदयस्पर्शी कथा असलेल्या 'शर्माजी नमकीन'चा ट्रेलर रिलीज - movie Sharmaji Namkeen

ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट शर्माजी नमकीनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ऋषी कपूर आणि परेश रावल मिळून या चित्रपटात प्रेमळ नायक साकारला आहे. आत्म-शोधाची हृदयस्पर्शी कथा यात साकारण्यात आली आहे.

'शर्माजी नमकीन'चा ट्रेलर रिलीज
'शर्माजी नमकीन'चा ट्रेलर रिलीज

By

Published : Mar 17, 2022, 4:56 PM IST

मुंबई - 'शरमाजी नमकीन'चा ट्रेलर गुरुवारी रिलीज झाला. दिवंगत ऋषी कपूर आणि परेश रावल हे दोघेही एकच पात्र साकारत असलेल्या या चित्रपटात एका ५८ वर्षांच्या विधुराची कहाणी आहे, ज्याला निवृत्तीनंतर स्वयंपाकाची आवड पुन्हा जागृत होते. ट्रेलरमध्ये नायक बी.जी. शर्मा ( ऋषी कपूर आणि परेश रावल यांनी साकारलेला नायक ) निवृत्तीनंतरच्या आयुष्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि अखेरीस त्याला पाककलेबद्दलची आवड असल्याचे कळते.

2020 मध्ये त्यांच्या दुर्दैवी निधनाआधी ऋषी कपूर यांनी चित्रपटाचा काही भाग शूट केला होता. त्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी कथा आणि अभिनेत्याभोवती काम करण्याचा प्रयत्न केला, अगदी ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीरने प्रोस्थेटिक्स आणि VFX च्या मदतीने भूमिका साकारण्यासाठी तयारी केली होती. परंतु या भूमिकेसाठी परेश रावल तयार झाले आणि हा चित्रपट पूर्ण झाला.

हितेश भाटिया दिग्दर्शित आणि मॅकगफिन पिक्चर्सच्या सहकार्याने एक्सेल एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटात जुही चावला, सुहेल नय्यर, तारुक रैना, सतीश कौशिक, शीबा चड्ढा आणि ईशा तलवार यांच्याही भूमिका आहेत. 'शरमाजी नमकीन' 31 मार्च रोजी प्राइम व्हिडिओवर प्रीमियर होणार आहे.

हेही वाचा -जिममध्ये घाम गाळणाऱ्या या सुंदर अभिनेत्रीला ओळखलंत?

ABOUT THE AUTHOR

...view details