मुंबई- चित्रपट निर्माता करण जोहर स्टारकिड्स लॉन्च करण्यासाठी ओळखला जातो. गुरुवारी करण जोहरने तीन नवीन चेहरे बॉलिवूडमध्ये लॉन्च केले आहेत. करण जोहरने त्याच्या 'बेधडक' या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटातून स्टार किड शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शनाया कपूर ही अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे. संजय कपूर हा अभिनेता अनिल कपूरचा धाकटा भाऊ आहे. करण जोहरने याआधीच तिच्या लॉन्चची घोषणा केली होती.
करण जोहरने बुधवारी एका पोस्टमध्ये सांगितले होते की, तो बॉलिवूडमध्ये तीन नवीन चेहरे लॉन्च करणार आहे. गुरुवारी करणने या तीन नवोदित कलाकारांवरील पडदा उचलला आहे. करण जोहरने त्याच्या आगामी 'बेधडक' चित्रपटाची घोषणा केली आहे ज्यामध्ये शनाया कपूर 'निमृत' नावाच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर गुरफतेह पिरजादा 'अगंद'च्या भूमिकेत आणि अभिनेता लक्ष्य लालवानी 'करण'च्या भूमिकेत दिसणार आहे.