मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर 'कमीने' चित्रपटातील दुहेरी भूमिकेमुळे चांगलाच चर्चेत होता. २००९ साली आलेल्या या चित्रपटाने इतकी वर्ष उलटूनही प्रेक्षकांच्या मनातील आपलं स्थान कायम ठेवलं आहे. अशात चित्रपटाला मिळालेल्या या यशानंतर याचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार का? असा सवाल शाहिदला केला गेला.
'कमीने'च्या यशानंतर चित्रपटाचा सिक्वल येणार का? शाहिद कपूर म्हणतो... - double role
कमीने चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार का? असा सवाल शाहिदला केला गेला. या प्रश्नाचं उत्तर देताना शाहिद म्हणाला, हा प्रश्न तुम्ही विशाल भारद्वाज यांना विचारा.
या प्रश्नाचं उत्तर देताना शाहिद म्हणाला, हा प्रश्न तुम्ही विशाल भारद्वाज यांना विचारा. कारण याचा सिक्वल येणार असेल तर त्याचं लिखाण आणि सर्व जबाबदारी त्यांच्यावरच असणार आहे. तेच हा चित्रपट दिग्दर्शित करतील किंवा याची निर्मिती करतील. त्यामुळे, हा निर्णय त्यांचा असेल. मी तर या सिक्वलमध्ये काम करण्यास नेहमीच आनंदाने होकार देईल.
शाहिद लवकरच 'कबीर सिंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासून ट्रेलरपर्यंत सर्वालाच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट दाक्षिणात्य 'अर्जून रेड्डी' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात शाहिदसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत झळकणार आहे.