शाहिद कपूरचा कबीर सिंग प्रदर्शनासाठी सज्ज, ट्रेलरपासून गाण्यांना प्रेक्षकांची पसंती - song
शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी लवकरच कबीर सिंग चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटातील तुझे कितना चाहने लगे हम गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
शाहिद कपूरचा कबीर सिंग प्रदर्शनासाठी सज्ज
मुंबई - शाहिद कपूर आणि कियारा अडवाणीच्या मुख्य भूमिका असलेला कबीर सिंग चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. संदीप वंगा रेड्डी यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट येत्या २१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.