मुंबई- भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित 'मिशन मंगल' सिनेमा १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशात प्रदर्शनाच्या आधी सिनेमातील आणखी एक नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'शाबाशियां' असं या गाण्याचं शीर्षक आहे.
'शाबाशियां', 'मिशन मंगल'चं नवं गाणं प्रदर्शित - अभिजीत श्रीवास्तव
मंगळ मोहिमेला सुरूवात झाल्यापासून प्रत्येक टप्प्यावर मिळत जाणारं यश आणि मिळणारी कौतुकाची थाप याची झलक या गाण्यात पाहायला मिळत आहे. गाण्याला शिल्पा राव, आनंद भास्कर आणि अभिजीत श्रीवास्तव यांनी आवाज दिला आहे
यात मंगळ मोहिमेला सुरूवात झाल्यापासून प्रत्येक टप्प्यावर मिळत जाणारं यश आणि मिळणारी कौतुकाची थाप याची झलक पाहायला मिळत आहे. या गाण्याला शिल्पा राव, आनंद भास्कर आणि अभिजीत श्रीवास्तव यांनी आवाज दिला आहे. तर अमिताभ भट्टाचार्य यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत.
दरम्यान जगन शक्ती यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात मंगळ मोहिमेच्या यशात महत्त्वाचं योगदान असलेल्या व्यक्तींची कथा पाहायला मिळणार आहे. चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, शरमन जोशी, नित्या मेनन या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका असून हा सिनेमा गुरूवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.