महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 3, 2020, 8:10 AM IST

Updated : Jul 3, 2020, 9:31 AM IST

ETV Bharat / sitara

बॉलिवूडमधील सर्वांच्या लाडक्या 'मास्टर जी' सरोज खान

सरोज खान यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 साली झाला होता. आज (शुक्रवारी) वयाच्या 72 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे खरे नाव निर्मला नागपाल असे होते. 3 वर्षाच्या असतानाच त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. सरोज यांनी नजराना या चित्रपटातही बालकलाकार म्हणून काम केले होते. यानंतर 50 च्या दशकात त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले.

saroj khan
सरोज खान

हैदराबाद -बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी आज (शुक्रवारी) वयाच्या 72 व्या वर्षी मुंबईतील बांद्रा येथे असलेल्या गुरु नानक रुग्णालयात अखरेचा श्वास घेतला. 'मास्टर जी' म्हणून सरोज सर्वांच्या लाडक्या होत्या.

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानसोबत सरोज खान.

सरोज खान यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 साली झाला होता. त्यांचे खरे नाव निर्मला नागपाल असे होते. 3 वर्षाच्या असतानाच त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. सरोज यांनी नजराना या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. यानंतर 50 च्या दशकात त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले.

सरोज खान त्यांनी कोरिओग्राफर बी. सोबनलाल यांच्याकडून नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. सुरुवातीला सहायक नृत्यदिग्दर्शिका म्हणून त्यांनी काम केले. यानंतर 'गीता मेरा नाम' या चित्रपटापासून नृत्यदिग्दर्शिकेच्या रुपाने त्यांच्या करिअरची सुरुवात झाली.

एका रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धकास मार्गदर्शन करताना सरोज खान.

सरोज खान यांनी 1986 पासून 2019 पर्यंत हिंदी चित्रपटापटातील हजारो गाण्यांना नृत्यदिग्दर्शित केले होते. त्यात विशेष करुन निंबूडा निंबूडा, एक दो तीन, डोला रे डोला, काटे नहीं कटते, हवा-हवाई, ना जाने कहां से आई है, दिल धक-धक करने लगा, हमको आजकल है इंतजार, चोली के पीछे यांसारख्या अनेक सुपरहिट आणि लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे.

सरोज खान यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी तेजाब, खलनायक, मिस्टर इंडिया, चालबाज, नगीना, चांदनी, हम दिल दे चुके सनम, देवदास अशा 200 हून अधिक चित्रपटांतील गाण्यांना नृत्यदिग्दर्शित केले आहे. सरोज खान यांनी 'कलंक' चित्रपटातील 'तबाह हो गए' हे नृत्यदिग्दर्शित केलेले शेवटचे गाणे आहे. या गाण्यात अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी नृत्य केले आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि सरोज खान.

सरोज यांनी छोट्या पर्द्यावरील अनेक रिअॅलिटी कार्यक्रमांमध्येही सहभाग नोंदवला होता. 2005 मध्ये 'नच बलिए' या कार्यक्रमांत त्या परिक्षक म्हणून समोर आल्या होत्या. यानंतर याच कार्यक्रमाच्या दुसऱ्या हंगामातही त्यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. यानंतर 2008 मध्ये 'नचले वे विद सरोज खान' या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या समोर आल्या होत्या. या कार्यक्रमाला एनडीटीव्ही इमेजिन या वाहिनीवर प्रसारित करण्यात आले. या कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शनही त्यांनी केले होते.

सरोज खान आणि अभिनेत्री करिना कपूर

तसेच डिसेंबर 2008 मध्ये सोनी वाहिनीवरील 'बूगीवूगी' कार्यक्रमात परिक्षक जाफरी, नावेद जाफरी आणि रवि बहल यांसारख्या अनेक परिक्षकांसोबत त्यांनी काम केले. त्या 'झलक दिखला जा' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या तिसऱ्या हंगामातही परिक्षक म्हणून समोर आल्या होत्या. बॉलिवूड या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिकेला 'ईटीव्ही भारत'ची श्रद्धांजली.

Last Updated : Jul 3, 2020, 9:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details