मुंबई- अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच 'खानदानी शफाखाना' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. यासोबतचं ट्रेलर प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली होती. यापाठोपाठ आता चित्रपटाचं दुसरं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे.
सोनाक्षीच्या 'खानदानी शफाखाना'चं दुसरं पोस्टर प्रदर्शित, पाहा फोटो - varun sharma
'खानदानी शफाखाना' चित्रपटाचं दुसरं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये सोनाक्षी सिन्हा, वरूण शर्मा आणि गायक बादशाह यांची झलक पाहायला मिळत आहे.
या पोस्टरमध्ये सोनाक्षी सिन्हा, वरूण शर्मा आणि गायक बादशाह यांची झलक पाहायला मिळत आहे. अब शट अप नहीं, होगा शटर अप, असं कॅप्शन देत कोमल नाहटा यांनी हे पोस्टर शेअर केलं आहे. चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शिल्पी दासगुप्ता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर भूषण कुमार, महावीर जैन आणि म्रीघदीप सिंग लंबा यांची निर्मिती आहे. २६ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.सोनाक्षीचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.