महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 23, 2021, 2:33 AM IST

ETV Bharat / sitara

‘स्कॅम १९९२’ नंतर प्रतीक गांधीचे ‘अतीथी भूतो भव’ मध्ये भूतांसोबत ‘स्कॅम’!

‘स्कॅम १९९२, द हर्षद मेहता स्टोरी’ वेब सिरीज फेम प्रतीक गांधीला बॉलिवूडमध्ये चित्रपट ऑफर होताहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘अतीथी भूतो भव’. नुकतेच या चित्रपटाचे मथुरा शहरात शूटिंग सुरु झाले आहे. ‘अतीथी भूतो भव’ या चित्रपटाची निर्मिती हार्दिक गज्जर फिल्म्स आणि बॅक बेन्चर पिक्चर्स ने केली आहे.

स्कॅम १९९२, द हर्षद मेहता स्टोरी’ वेब सिरीज फेम प्रतीक गांधीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
स्कॅम १९९२, द हर्षद मेहता स्टोरी’ वेब सिरीज फेम प्रतीक गांधीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

मुंबई - नव्वदीत शेअर बाजारामध्ये अभूतपूर्व आर्थिक घोटाळा घडून गेलाय ज्याला ‘हर्षद मेहता स्कॅम’ म्हणून ओळखले जाते. तो देशाच्या आर्थिक व राजकीय क्षेत्राला विस्कळीत करणारा होता व हर्षद मेहता याचे सामान्य मध्यमवर्गीय माणूस ते करोडपती हा प्रवास अचंबित करणारा होता. त्याच्या जीवनावर आधारित अभिषेक बच्चन अभिनित ‘बिग बुल’ हा चित्रपट येऊ घातलाय. परंतु त्याआधीच दिग्दर्शक हंसल मेहता यांनी याच विषयावर वेब सिरीज बनविली जी प्रचंड लोकप्रिय झाली. ‘स्कॅम १९९२, द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेब सिरीज कित्येक दिवस एक नंबरवर ट्रेंडिंग होती. त्यातील प्रमुख भूमिका बजावणारा प्रतीक गांधी रातोरात स्टार झाला. खरंतर प्रतीक गेल्या १५ वर्षांपासून अभिनयक्षेत्रात वावरतोय व तो गुजराती नाटक-सिनेमातील आघाडीचा नट आहे.

इतकी प्रसिद्धी मिळाल्यावर साहजिकच प्रतीक गांधीला बॉलिवूडमध्ये चित्रपट ऑफर होताहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘अतीथी भूतो भव’. नुकतेच या चित्रपटाचे मथुरा शहरात शूटिंग सुरु झाले आहे. ही एक रोमँटिक कॉमेडी असून प्रतीक भूतांबरोबर कोणता ‘स्कॅम’ करतो हे बघणे रोचक असेल. ‘अतीथी भूतो भव’ या चित्रपटामध्ये प्रतिक प्रथमच अभिनेता जॅकी श्रॉफसह भूमिका करताना दिसणार आहे. या रोमँटिक कॉमेडीमध्ये प्रतिक गांधींचा लव्ह-अँगल असेल अभिनेत्री शर्मिन सेगल.

डॉ. जयंतीलाल गडा यांच्या पेन स्टुडिओने सादर केलेला हार्दिक गज्जर दिग्दर्शित ‘अतीथी भूतो भव’ या चित्रपटाची निर्मिती हार्दिक गज्जर फिल्म्स आणि बॅक बेन्चर पिक्चर्स ने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details