महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ठरलं तर! भन्साळींच्या आगामी चित्रपटात झळकणार 'हे' नवे चेहरे - sharmin segal

दिग्दर्शक संजय लिला भन्साळी त्यांच्या आगामी चित्रपटातून दोन नवे चेहरे लॉन्च करणार आहेत. बेला सेगल यांची मुलगी शर्मिन सेगल तर जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान जाफरी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

भन्साळींच्या आगामी चित्रपटात झळकणार 'हे' नवे चेहरे

By

Published : May 16, 2019, 2:18 PM IST

मुंबई- बॉलिवूडमधूल आघाडीचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी हे रोमॅन्टिक चित्रपटांचे बादशाह मानले जातात. त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकरांना त्यांच्या चित्रपटातून ओळख मिळाली आहे. आता त्यांच्या आगामी चित्रपटातून ते आणखी दोन नवे चेहरे लॉन्च करणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाविषयीची चर्चा असून 'मलाल' असं या चित्रपटाचं शीर्षक आहे. या चित्रपटातून संजय लिला भन्साळी त्यांची बहिण बेला सेगल यांची मुलगी शर्मिन सेगल हिला बॉलिवूडमध्ये आणणार आहेत. तर तिच्या अपोझिट जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान जाफरी हा झळकणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याबद्दलची अधिकृत घोषणा केली आहे. येत्या १८ मे रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संजय लिला भन्साळी, भूषण कुमार, महावीर जैन आणि क्रिशन कुमार या चित्रपटाची निर्मिती करणार असून मंगेश हाडवळे यांचं दिग्दर्शन असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details