महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आठवणी कधीही पुसल्या जात नाहीत, संजयने शेअर केला नर्गिस यांचा फोटो - sunil dutt

या फोटोत नर्गिस यांच्यासोबत बालपणीचा संजय दिसत आहे. काही आठवणी कधीच पुसल्या जात नाहीत, असं भावनिक कॅप्शन संजयने या फोटोला दिलं आहे. या फोटोला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

संजयने शेअर केला नर्गिस यांचा फोटो

By

Published : Jun 1, 2019, 4:05 PM IST

Updated : Jun 1, 2019, 5:05 PM IST

मुंबई- बॉलिवूडवर ६०-७० च्या दशकात आपली जादू उमटवणाऱ्या अभिनेत्री नर्गिस यांचा आज जन्मदिवस. संजय दत्तच्या यशात सिंहाचा वाटा असणाऱ्या नर्गिस यांची या खास दिवशी संजयला आठवण न येणं शक्यच नाही. म्हणूनच संजयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आईचा एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोत नर्गिस यांच्यासोबत बालपणीचा संजय दिसत आहे. काही आठवणी कधीच पुसल्या जात नाहीत, असं भावनिक कॅप्शन संजयने या फोटोला दिलं आहे. या फोटोला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. संजयच्या आयुष्यातील एक वाईट गोष्ट म्हणजे त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच नर्गिस यांचं निधन झालं. त्यामुळे, एक अभिनेता म्हणून संजयला पडद्यावर पाहण्याची संधी नर्गिस यांना मिळाली नाही.

संजयने शेअर केला नर्गिस यांचा फोटो

'रॉकी' या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर संजयला चांगलीच लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वीच त्याच्या जीवनावर आधारित 'संजू' चित्रपटही प्रदर्शित झाला. यात त्याचा खडतर प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला यशाच्या शिखरावर असलेल्या संजयला आजही नर्गिस आणि सुनील दत्त यांची कमी जाणवते, हे अनेकदा त्याच्या पोस्टमधून दिसतं.

Last Updated : Jun 1, 2019, 5:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details