आजकाल बॉलिवूडचे अनेक सुपरस्टार मराठी चित्रपटांचे प्रमोशन करताना दिसतात. कधीकधी मराठी चित्रपटांमध्ये त्यांची पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील असते. सलमान खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, रणबीर कपूर आणि इतर बरेचसे कलाकार मराठी चित्रपटांमध्ये काही अशंत: दिसले आहेत. काही कलाकार त्यांच्या सोशल मीडिया पेजवरूनही मराठी चित्रपटांचे प्रमोशन करत असतात. यात आता संजय दत्त याचाही समावेश झाला आहे. नुकताच त्याने एक व्हिडिओ पोस्ट करून 'डोक्याला शॉट' या मराठी चित्रपटाचे प्रमोशन केले आहे.
'डोक्याला शॉट' या चित्रपटातून संजय दत्त निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'डोक्याला शॉट देऊ नका, सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहा, चित्रपट १ मार्चला प्रदर्शित होणार आहे', असे तो या व्हिडिओत म्हणताना दिसत आहे.