मुंबई- प्रेग्नंसीदरम्यान केलेल्या अंडरवॉटर फोटोशूटमुळे अभिनेत्री समीरा रेड्डी चांगलीच चर्चेत आली होती. अशात आता समीराच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. समीरानं स्वतःच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
समीरा रेड्डीला कन्यारत्न, ५ वर्षांपूर्वी मराठमोळ्या अक्षय वर्देसोबत बांधली लग्नागाठ
आज सकाळी आमच्या घरी एका लहान परीचं आगमन झालं, माझी मुलगी, तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि प्रार्थनांसाठी आभार, अशी पोस्ट समीराने शेअर केली आहे. दरम्यान समीरा दुसऱ्यांदा आई झाली आहे.
आज सकाळी आमच्या घरी एका लहान परीचं आगमन झालं, माझी मुलगी, तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि प्रार्थनांसाठी आभार, अशी पोस्ट समीराने शेअर केली आहे. दरम्यान समीरा दुसऱ्यांदा आई झाली आहे. २०१५ मध्ये समीराने पहिल्या मुलाला जन्म दिला होता.
२००२ मध्ये आलेल्या मैंने दिल तुझको दिया, या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, तिचं चित्रपटासृष्टीतील करिअर फार यशस्वी ठरलं नाही. २१ जानेवारी २०१४ ला समीराने मराठमोळा उद्योजक अक्षय वदेर्सोबत लग्नगाठ बांधली. सध्या ती चित्रपटसृष्टीपासून जरीही लांब असली तरी सोशल मीडियावर फोटोंमुळे चांगलीच चर्चेत असते.