मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा बहुचर्चित 'राधेः युवर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट ईदला रिलीज झाला. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटाने इतिहास रचला आहे. चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशी प्लॅटफॉर्मवर ४.२ दशलक्ष व्यूव्ह्जने सर्वाधिक पाहिलेला चित्रपट बनला आहे. आयएमडीबी रेटिंग व्यासपीठावर मात्र सलमानला सर्वात वाईट रेटिंग मिळाले आहे.
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होऊ शकला नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पे-पर-व्ह्यूद्वारे आणि आघाडीच्या डीटीएच ऑपरेटरद्वारे हा चित्रपट देशातील चाहत्यांपर्यंत पोहोचला. हा चित्रपट ४० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ज्यात प्रमुख परदेशी मार्केटचाही समावेश आहे.
शुक्रवारी बिझिनेस अपडेट शेअर करत सलमान खान फिल्म्सच्या सोशल मीडिया हँडल्सने चित्रपटाचे खास पोस्टर शेअर केले असून असा दावा केला आहे की चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रेकॉर्ड तोडले आहे आणि हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ४. २ दशलक्षाहून अधिक प्रेक्षकांनी पाहिला आहे.