महाराष्ट्र

maharashtra

सलमानचे वडील सलीम खान म्हणाले, "'राधे' हा अजिबात उत्तम चित्रपट नाही"

By

Published : May 28, 2021, 9:16 PM IST

ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांनी आपला मुलगा सलमान खानच्या ईदला रिलीज झालेल्या 'राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटाबद्दल आपले विचार मांडले आहेत. 'राधे' हा “अजिबात उत्तम चित्रपट नाही, असे त्यांनी म्हटलंय.

Salman Khan's father Salim Khan
सलमानचे वडील सलीम खान

मुंबई- ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खानने आपला मुलगा सलमान खानच्या 'राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटाबद्दल आपले विचार मांडले आहेत. कोरियन अ‍ॅक्शन थ्रिलर 'द आऊटलाऊज' च्या प्रेरणेने तयार झालेल्या या चित्रपटाविषयी सांगण्यासारखी फार काही नसल्याचे सलीम खान यांनी म्हटलंय.

सामान्यपणे सलमानच्या कामाबद्दल नेहमी चिकीत्सा करणाऱ्या सलीम यांनी 'राधे'बद्दल टीका केली आहे. 'दबंग ३' आणि 'बजरंगी भाईजान' हे सिनेमे चांगले आणि पूर्णतः वेगळे होते, असे सलीम खान यांनी म्हटले होते.

ते पुढे म्हणाले की, '''राधे' हा “अजिबात उत्तम चित्रपट नाही” पण व्यावसायिक सिनेमा म्हणून माझ्या मुलाने (सलमान)न या चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकार, तंत्रज्ञ, डिस्ट्रीब्यूटर्स, स्टेक होल्डर्स या सर्वांना त्यांचे पैसे मिळतील याची खबरदारी घेतली आहे."

जावेद अख्तरसोबत 'शोले' आणि 'दीवार'सह अनेक यशस्वी चित्रपटांची सह-लेखन करणारे सलीम म्हणाले की, "'राधे'चे स्टेक होल्डर्स "फायद्यात" आहेत परंतु चित्रपट काही फार चांगला नाही."

सलमानने यापूर्वीच सांगितले होते, की त्याचे वडील त्याच्या कामाचे सर्वात मोठे टीकाकार आहेत. कलाकार हा चित्रपट समीक्षकांचा फार मोठा चाहता नसतो आणि जेव्हा ते कामाचे कौतुक करतात तेव्हा त्यांची भीती वाटते.

हेही वाचा - सुशांत सिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला एनसीबीकडून अटक

ABOUT THE AUTHOR

...view details