मुंबई- बॉलिवूड भाईजान सलमान खानचा 'भारत' चित्रपटात ईदच्या दिवशी म्हणजेच ५ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात सलमानशिवाय कॅटरिना आणि दिशा पटानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. यात दिशाने सलमानच्या पहिल्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आहे.
'भारत'मधील 'स्लो मोशन' गाण्यावर थिएटरमध्येच थिरकले प्रेक्षक, दिशाने शेअर केला व्हिडिओ - dance
चित्रपटात सलमान आणि दिशावर चित्रीत केलेलं 'स्लो मोशन' हे गाणं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता तर प्रेक्षकांनी थिएटरमध्येच हे गाणं सुरू होताच त्यावर नाचायला सुरूवात केली आहे.
चित्रपटात सलमान आणि दिशावर चित्रीत केलेलं 'स्लो मोशन' हे गाणं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता तर प्रेक्षकांनी थिएटरमध्येच हे गाणं सुरू होताच त्यावर नाचायला सुरूवात केली आहे. दिशा पटानीने आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
या गाण्याशिवाय चित्रपटालाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटाने केवळ तीन दिवसांत ९५ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर पहिल्याच दिवशी ४२ कोटींची कमाई करणारा हा सलमानचा पहिला चित्रपट ठरला आहे. आता हा चित्रपट आणखी कोणते नवीन रेकॉर्ड बनवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.