मुंबई - बॉलीवूड अभिनेता सलमान खानने रविवारी चाहत्यांना ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देण्यासाठी त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत त्याने आपला सुपरहिट चित्रपट 'मैने प्यार किया' मधील एक सीन रिक्रियेट केला. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर त्याने या व्हिडिओतून खास संदेश दिला आहे.
सलमान खानने शेअर केलेल्या या व्हिडिओत तेव्हाचा आणि आत्ताचा सीन दाखवण्यात आला आहे. तेव्हाच्या एका सीन मध्ये सुमन प्रेमसाठी एक पत्र आणि काचेवर आपल्या लिपस्टिकचे निशाण ठेवून जात असते. त्यांनतर प्रेम त्या लिपस्टिकच्या निशाणावर चुंबन घेताना दिसतो.
तर, आत्ताच्या सीनमध्ये सलमान ते काचेवर असलेले लिपस्टिकचे निशाण सॅनिटायझर आणि टिशू पेपरने पुसून टाकतो.
सलमान खानने रिक्रियेट केला त्याच्या 'या' सुपरहिट चित्रपटातील सीन, पाहा व्हिडिओ - salman khan throughback video
हा व्हिडिओ शेअर करून सलमानने त्यावर चाहत्यांना सुरक्षित राहण्याचा संदेश दिला आहे.
हा व्हिडिओ शेअर करून सलमानने त्यावर चाहत्यांना सुरक्षित राहण्याचा संदेश दिला आहे.
'मैने प्यार किया' हा सलमानच्या करीअरला कलाटणी देणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री भाग्यश्री मुख्य भूमिकेत झळकली होती. याच चित्रपटानंतर सलमान खान सुपरस्टार झाला होता. यामध्ये त्याने 'प्रेम'ची भूमिका साकारली होती. तर भाग्यश्री 'सुमन'च्या भूमिकेत दिसली होती. आजही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी क्रेझ आहे.
सध्या कोरोना विषाणूमुळे सर्व कलाकार घरी बसून आहेत. देशात लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व सेलेब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ना काही पोस्ट करत असतात. तसेच, नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहनही करताना दिसतात. सलमान खानने देखील या व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.