मुंबई - सलमान खान आपल्या आगामी 'राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. ऑगस्टमध्ये पुन्हा शूटिंग सुरू करण्यासाठी त्याने मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये परवानगी मागितली आहे.
मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे उर्वरित एक गाणे किमान कलाकारासह कसे शूट कसे करावे याविषयी राधेचे दिग्दर्शक प्रभुदेवा आणि इतर विचार करत आहेत.
अहवालात पुढे असे नमूद केले आहे की, जर स्टुडिओ बुक झाला तर ऑगस्ट महिन्यात शूटिंग पार पडेल.
एका सूत्रांनी सांगितले की, "या ऑगस्टमध्ये अनेक चित्रपट फ्लोअरवर जाण्याची शक्यता आहे. सलमान खान, निर्माता अतुल अग्निहोत्री आणि दिग्दर्शक प्रभुदेवा तिघेजण मिळून कोव्हिड -१९ नंतर कोणताही अडथळा न येता आणि सिनेमाच्या स्केलशी तडजोड न करता शूटिंग कसे पूर्ण करता येईल यावर विचार करीत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शूटिंगला सुरूवात होऊ शकेल आणि महिना अखेरपर्यंत सलमानसह सिनेमाचे शूटिंग पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे."
हेही वाचा - किंग खानच्या चाहत्यांसाठी खूशखबर.. राजकुमार हिरानींच्या आगामी सिनेमात शाहरुख खान
सलमान आणि दिशा पाटणी यांच्याशिवाय 'राधे'मध्ये जॅकी श्रॉफ आणि रणदीप हूडा ही मुख्य भूमिका आहेत.