महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

VIDEO : मध्यप्रदेशातील मंडलेश्वरच्या रस्त्यावर सल्लूची सायकल सवारी, चाहत्यांची गर्दी - video

'दबंग ३' चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभूदेवा करत आहे. तर इतर दोन भागांप्रमाणे या भागातही सलमानच्या अपोझिट सोनाक्षीची वर्णी लागली असल्याचे म्हटले जात आहे.

सलमानची सायकल सवारी

By

Published : Apr 3, 2019, 3:30 PM IST

मुंबई- बॉलिवूड भाईजान सलमान खान सध्या आपल्या 'दबंग ३'च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. नुकतीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला मध्यप्रदेशात सुरूवात झाली आहे. या दरम्यान सलमानचा सायकल सवारी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान मंडलेश्वरच्या रस्त्यावर सायकल सवारीचा आनंद घेताना दिसत आहे.

विशेष म्हणजे सलमानला अशा पद्धतीने पाहून त्याचे चाहते सायकलच्या मागे धावताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून भाईजानच्या चाहत्यांची या व्हिडिओला पसंती मिळताना दिसत आहे. सलमानशिवाय या व्हिडिओमध्ये अरबाज खानही सायकल सवारी करताना दिसत आहे.


'दबंग ३' चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभूदेवा करत आहे. तर इतर दोन भागांप्रमाणे या भागातही सलमानच्या अपोझिट सोनाक्षीची वर्णी लागली असल्याचे म्हटले जात आहे. आता चित्रपटाच्या तिसऱ्या भागाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details