मुंबई - दबंग खान म्हणजेच सलमान खानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून त्याच्या लाखो-करोडो चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. चाहत्यांना भाईजानचा फोटो आवडला आहे, मात्र सलमानने फोटोसोबत लिहिलेले कॅप्शन वाचून चाहत्यांची तारांबळ उडाली आहे. सलमानच्या चाहत्यांनी अभिनेत्याला त्याच्या कॅप्शनचा अर्थही विचारला आहे. गुरुवारी रात्री सलमानने हा फोटो शेअर केला आहे.
सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तो अगदी साध्या लूकमध्ये दिसत आहे. सलमानने डोक्यावर स्कार्फ बांधला आहे. हा फोटो शेअर करत सलमान खानने लिहिले आहे की, 'मी जाहिराती आणि ट्रेलर इत्यादी पोस्ट करतो. माझा स्वतःचा ब्रँड आहे, तुम्हाला समजले नाही का? सर्वांचे ऐकत आहे, मी तुम्हाला पाहतोय, मी तुम्हाला ऐकतोय, आज एक पोस्ट, उद्या एक टीझर'.
सलमान खानचे हे कॅप्शन वाचून चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे. भाईजानला काय म्हणायचे आहे याचा अंदाज चाहते घेत आहेत. अनेक चाहते त्याचा हा लूक सलमानच्या नवीन चित्रपट टायगर 3 शी जोडूनही पाहत आहेत.