मुंबई- सुपरस्टार सलमान खान आणि त्याचा मेव्हणा आयुष शर्मा आगामी चित्रपटात स्क्रिन स्पेस शेअर करणार आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'अंतिम' या चित्रपटात ते एकत्र काम करतील. ६ डिसेंबरपासून या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झाली आहे.
सलमानने आयुषला 'लव्हयात्री' या चित्रपटात २०१८ मध्ये लाँच केले होते. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून खूप प्रतिसाद मिळाला. त्याचा पुढचा चित्रपट आयुषच्या अभिनय करिअरला चालना देण्याचा प्रयत्न आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात सलमान एक शीख सिपाही साकारणार आहे तर आयुष एका भयानक गुंडाची भूमिका साकरताना पाहायला मिळेल.
रिपोर्ट्सनुसार, १६ नोव्हेंबर रोजी पुण्यामध्ये 'अंतिम'च्या शूटची सुरुवात एका महत्त्वपूर्ण पाठलाग सीक्वेन्सने झाली. त्यानंतर टीमने काही सीन्स कर्जतमध्ये शूट केले. अभिनेता निकीतन धीर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका करताना दिसेल.