मुंबई- सलमान खानच्या लूक्स पासून त्याची बॉडी, अॅक्शन, डान्स यांचे बॉलिवूडमध्ये प्रचंड चाहते आहेत. खरंतर यामागे त्याची भरपूर मेहनत आहे. यासाठी तो आपला बराचसा वेळ जीममध्ये घालवत असतो. जीममधील अनेक व्हिडिओ तो सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करताना दिसतो. अशात आता त्याचा आणखी एक फोटो समोर आला आहे.
पाहा, फिटनेस आयकॉन असलेल्या भाईजानचा नवा फोटो - video
सलमान बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यांच्या यादीतील एक असल्याचा पुरावा सलमानचा लेटेस्ट फोटो देतो. या फोटोमध्ये सलमान खान लेग स्प्लिट करताना दिसत आहे.
सलमान बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यांच्या यादीतील एक असल्याचा पुरावा सलमानचा लेटेस्ट फोटो देतो. या फोटोमध्ये सलमान खान लेग स्प्लिट करताना दिसत आहे. भाईजानचा हा फोटो त्याच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. या फोटोसोबतच सलमानने आपला वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर सलमानच्या 'भारत'नं २०० कोटींचा गल्लाही पार केला आहे. यानंतर सलमानकडे 'दबंग ३', 'इंशाल्लाह' आणि 'किक २' हे चित्रपट आहेत. भाईजान सध्या 'दबंग ३'च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात त्याच्या अपोझिट अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झळकणार आहे.