महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कोरोनामुळे आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या मुलाच्या मदतीला धावला सलमान खान - सलमानची विद्यार्थ्याला मदत

कोरोनामुळे आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या मुलाच्या मदतीला सलमान खान धावून आला आहे. सायन्समध्ये शिकत असलेल्या कर्नाटकातील या विद्यार्थ्याला सलमानने मदत पोहोचवली आहे.

Salman Khan
सलमान खान

By

Published : May 5, 2021, 6:00 PM IST

मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान कर्नाटकमधील एका अल्पवयीन विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी पुढे आला आहे. या मुलाच्या वडिलांचे कोविडमुळे निधन झाले होते.

एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, कर्नाटकातील १८ वर्षाच्या सायन्स विद्यार्थ्याने केलीली याचिका युवा सेनेचे नेते राहूल एस कनाल यांनी सलमानखानच्या निदर्शनास दिली होती. राहुल हे सलमान खानच्या बिइंग हंग्री या फुड ट्रक उपक्रमामध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करतात.

वेबलॉईडशी बोलताना राहुल म्हणाले, "आम्ही त्यांना रेशन आणि शैक्षणिक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. आम्ही त्याच्या मदतीसाठी कायम दक्ष आहोत आणि जी काही गरज त्याला पडेल ती मदत आम्ही करु. सलमानचे फॅन्स कुटुंबीय आम्हाला इतरांना मदत करण्यास सक्षम बनवित आहे. सलमान यांनी आम्हाला गरजवंतांना मदत करण्यासाठी पाठवले आहे. प्रत्येक फॅन क्लब त्याच्यासाठी समर्पित असल्याची जाणीव त्याला आहे. त्याच्यासाठी येणाऱ्या प्रत्येक विनंतीला मदत करण्यासाठी तो पुढे सरसावतो.'', असे राहुल यांनी सलमानबद्दल सांगितले.

दरम्यान, आपल्या आई वडिलांच्या दयाळू वागण्याच्या प्रेरणेतून भाईजान किचन या चायनीज रेस्टॉरंटमधून कोविड फ्रंटलाईन वर्कर्ससाठी जेवणाची पाकिटे उपलब्ध करण्यासाठी सलमान खानने पुढाकार घेतला आहे. राहुल यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाद्वारे पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि कंटेंट झोनमध्ये राहणाऱया लोकांसह किमान ५ हजार फ्रंटलाइन कामगारांना जेवणाचे पाकिटे उपलब्ध करण्याचे लक्ष्य आहे. भाईजान किचनमध्ये बनविलेले जेवण नंतर बिइंग हॅंग्री व्हॅनद्वारे संपूर्ण मुंबईत पुरविले जाते.

बिइंग हंग्री फुड ट्रक उपक्रम

सलमान खान आपला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधेः युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या ईदच्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. ईदच्या निमित्ताने हा चित्रपट १३ मे रोजी ४० हून अधिक देशामध्ये रिलीज होणार आहे. झी 5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि सर्व आघाडीच्या डीटीएच ऑपरेटर झेडईच्या पे-व्ह्यू-सर्व्हिस झेडईप्लेक्ससह हा चित्रपट ZEE5 वर उपलब्ध असेल.

बिइंग हंग्री फुड ट्रक उपक्रम

हेही वाचा - ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ सीझन-२ साठी डिजिटल ऑडिशन्स सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details