मुंबई -सध्या 'बॉटल कॅप चॅलेंज' वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीव्ही कलाकरांपासून बॉलिवूड कलाकरांपर्यंत सर्वांनीच हे बॉटल कॅप चॅलेंज पूर्ण केले आहे. कोणी अगदी मजेशीर स्टाईलने, तर कोणी आपल्या हटके अंदाजात हे आव्हान स्विकारून आपले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यानेही हे चॅलेंज स्विकारून पूर्ण केले आहे. मात्र, यासोबतच त्याने एक मोलाचा सल्लादेखील चाहत्यांना दिला आहे.
सलमाननेही पूर्ण केलं 'बॉटल कॅप' चॅलेंज, मजेशीर अंदाजात देतोय 'हा' सल्ला - bottle cap challenge
सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अगदी मजेशीर पद्घतीने तो हे चॅलेंज पूर्ण करतो.
सलमाननेही पूर्ण केलं 'बॉटल कॅप' चॅलेंज, मजेशीर अंदाजात देतोय 'हा' सल्ला
सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अगदी मजेशीर पद्घतीने तो हे चॅलेंज पूर्ण करतो. त्यासोबत पाणी वाचवा, असा संदेश चाहत्यांना देतो.
सलमानपूर्वी अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, विद्युत जामवाल, कुणाल खेमू यांसारख्या कलाकारांनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे. त्यांच्याव्यतिरिक्त सिद्धार्थ मल्होत्रा, सुष्मिता सेन, यांचेही व्हिडिओ समोर आले होते.