महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सलमान खानने घोड्यासोबत पाने खाऊन केला ब्रेकफास्ट, पाहा व्हिडिओ - salman khan in lockdown

सलमान खानला प्राणी आणि लहान मुलांसोबत वेळ घालवायला खूप आवडते. त्यामुळे तो लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेत आपल्या भाच्यांसोबतही वेळ घालवताना दिसतो.

salman khan breakfast with horse with eating leaves, watch video
सलमान खानने घोड्यासोबत पाने खाऊन केला ब्रेकफास्ट, पाहा व्हिडिओ

By

Published : Apr 11, 2020, 9:37 AM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या लॉकडाऊनमुळे घरात आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. लॉकडाऊन दरम्यान तो वेगवेगळ्या गोष्टी करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो आपल्या लाडक्या घोड्यासह चक्क पाने खाऊन ब्रेकफास्ट करताना दिसतो.

'माझ्या आवडत्या घोड्यासोबत ब्रेकफास्ट', असे कॅप्शन देऊन त्याने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सलमान खानने पाने खाल्यानंतर ही पाने खरच चांगली आहेत, असे म्हटले.

सलमान खानला प्राणी आणि लहान मुलांसोबत वेळ घालवायला खूप आवडते. त्यामुळे तो लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेत आपल्या भाच्यांसोबतही वेळ घालवताना दिसतो.

सलमान सध्या पनवेल येथील फार्महाऊसवर थांबलेला आहे. तो जवळपास 3 आठवड्यांपासून आपल्या वडिलांना भेटलेला नाही. आपल्या वडिलांच्या आठवणीतही त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता.

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे कलाकार देखील घरात बसून वेळ घालवत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details