मुंबई- सैफ अली खान याच्या आगामी 'लाल कप्तान'ची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात तो नागा साधूच्या भूमिकेत झळकणार आहे. यापूर्वी काही पोस्टर्स प्रसिध्द करण्यात आली होती. याची पहिली झलक असलेला टिझर व्हिडिओ प्रदर्शित झालाय. यात त्याचा लूक आपण पाहिला असेल. आता एक नवेकोरे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आले आहे.
नागा साधूच्या भूमिकेतील सैफ अलीच्या 'लाल कप्तान'ची नवी झलक - Saif Ali Khan play Naga Sadhu in Lal Kaptan
सैफ अली खानच्या लाल कप्तान चित्रपटाचे नवे पोस्टर लॉन्च करण्यात आलाय. यात तो नागा साधूची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट १८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
लाल कप्तान नवे पोस्टर
सैफ अली खानचा हा एक पिरीयड ड्रामा आहे. यात त्याची भूमिका खूपच आकर्षक आहे. यात तो एका नागा साधूची भूमिका साकारत आहे. नवदिप सिंह यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.