मुंबई - सैफ अली खान याचा आज ४९ वा वाढदिवस आहे. त्याचा आगामी चित्रपट 'लाल कप्तान' प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यात तो एकदम वेगळ्या भूमिकेत दिसेल. याची पहिली झलक असलेला टिझर व्हिडिओ प्रदर्शित झालाय.
नागा साधू प्रेक्षकांच्या भेटीला, सैफ अलीच्या 'लाल कप्तान'ची झलक पाहिलीत का ? - Navdip Sing
सैफ अली खानच्या ४९ व्या वाढदिवसानिमित्य आज त्याच्या लाल कप्तान चित्रपटाचा टिझर लॉन्च करण्यात आलाय. यात तो नागा साधूची भूमिका साकारत आहे.
लाल कप्तान
३६ सेकंदाच्या या व्हिडिओत तो आपल्या चेहऱ्यावर विभूती लावताना दिसतोय. टिझरसह या चित्रपटाची रिलीज तारीखही जाहीर करण्यात आलीय. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर प्रियंका चोप्राच्या 'द स्काय इज पिंक' या चित्रपटाशी होणार आहे. ११ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सैफ अली खानचा हा एक पिरीयड ड्रामा आहे. यात त्याची भूमिका खूपच आकर्षक आहे. यात तो एका नागा साधूची भूमिका साकारत आहे. नवदिप सिंह यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.