मुंबई- आशिकी २ फेम अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच 'साहो' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला. ज्यानंतर चाहत्यांची या सिनेमाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशात आता या चित्रपटाच्या युरोपमधील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.
श्रद्धानं सुरू केलं 'साहो'चं युरोपमधील चित्रीकरण, फोटो केले शेअर - europe schedule
श्रद्धा कपूरनं आपल्या इन्स्टाग्रामवरून काही फोटो पोस्ट करत तिच्या या युरोप ट्रीपची झलक प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. युरोपच्या निसर्ग सौंदर्यासोबतच तिनं आपली आई शिवांगी कोल्हापूरेसोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत.
श्रद्धा कपूरनं आपल्या इन्स्टाग्रामवरून काही फोटो पोस्ट करत तिच्या या युरोप ट्रीपची झलक प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. युरोपच्या निसर्ग सौंदर्यासोबतच तिनं आपली आई शिवांगी कोल्हापूरेसोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत. साहो चित्रपट देशात आणि देशाबाहेर चित्रित केला जात आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत करत असून भूषण कुमार यांची टी सीरीज आणि यूवी क्रिएशन प्रॉडक्शन प्रस्तुत करते आहेत. तर वामसी, प्रमोद अणि विक्रम हे चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धा आणि प्रभास पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. तर याच चित्रपटातून श्रद्धा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. येत्या १५ ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.