मुंबई- बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार कॉमेडी, रोमँटीक, अॅक्शन आणि गंभीर सामाजिक विषय अशा विविध प्रकारचे आशय असलेल्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्यामुळे, अक्षयसाठी काहीच अशक्य नाही, असं अनेकदा त्याचे चाहते म्हणत असतात. मात्र, आता सामान्यांशिवाय कलाकारांनीही हे मान्य केलं आहे.
अक्षयच्या आवाजातील 'मिशन मंगल'चा मराठी प्रोमो, रितेशनं दिलं खास कॅप्शन - मराठी
'मिशन मंगल'चा अक्षयच्या आवाजातील मराठी प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यात अक्षयची मराठी भाषेतील स्पष्टता ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. हाच प्रोमो शेअर करत रितेशने त्याला कॅप्शन दिलं आहे.
नुकतंच नारी शक्तीचं वर्णन करणारा मिशन मंगल चित्रपटाचा हिंदी प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. ये सिंदूर दूर तक जाएगा अशा ओळी असलेल्या या प्रोमोला अक्षयनं आपला आवाज दिला आहे. आता यापाठोपाठ अक्षयच्याच आवाजातील मराठी प्रोमोही प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यात अक्षयची मराठी भाषेतील स्पष्टता ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
हाच प्रोमो शेअर करत रितेशने त्याला कॅप्शन दिलं आहे. अशी कोणती गोष्ट आहे का, जी हा माणूस करू शकत नाही? एक नंबर!! कडक...मिशन मंगलमधील महिलांनाही शुभेच्छा, असं रितेशनं म्हटलं आहे. रितेशच्या या ट्विटवर उत्तर देत अक्षयनं त्याचे आभार मानले आहेत. विज्ञान हे नेहमीच काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असतं. त्यामुळे, तुमचे स्वतःचेच छोटे छोटे अडथळे दूर करा. मीदेखील तोच प्रयत्न करत आहे. बाकी मराठी प्रोमोमध्ये काही चूक झाली असेल तर माफ करा, असं अक्षयनं म्हटलं आहे.