महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जेव्हा परदेशी मीडिया खरेदी करता येत नाही, ‘टाइम’च्या कव्हरपेजवरून रिचाचा मोदींना टोला - PM

रिचा चड्ढाने सोशल मीडिया अकाऊंटवरून टाईम मासिकाच्या कव्हरपेजचा फोटो शेअर केला आहे. तर या फोटोला दिलेल्या कॅप्शनमधून तिने मोदींना टोला लगावला आहे

‘टाइम’च्या कव्हरपेजवरून रिचाचा मोदींना टोला

By

Published : May 13, 2019, 4:33 PM IST

मुंबई- अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी झळकले आहेत. दुफळी निर्माण करणारा भारतातील एकमेव नेता म्हणून पंतप्रधान मोदींचा उल्लेख टाईम मासिकात करण्यात आल्याने खळबळ उडाली असतानाच अभिनेत्री रिचा चड्ढाने आता याच गोष्टीवरून मोदींवर निशाणा साधला आहे.

आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून टाईम मासिकाच्या कव्हरपेजचा फोटो तिने शेअर केला आहे. तर या फोटोला दिलेल्या कॅप्शनमधून तिने मोदींना टोला लगावला आहे. जेव्हा तुम्ही परदेशी प्रसारमाध्यमे विकत घेऊ शकत नाही, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हे हिंदुत्ववादाचे राजकारण करत आहेत. त्यामुळे समाजात ध्रुविकरण होत असल्याचा आरोप टाईममध्ये लेख लिहिणाऱ्या आतिश तासीर यांनी केला होता. मोदींचा दुफळी निर्माण करणारा नेता असा उल्लेख केल्यानंतर सोशल मीडियावरही याबद्दलच्या चर्चांना उधाण आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details