महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रियाने सुशांतला तीन महिने रिसॉर्टमध्ये ठेवले होते, सुशांतच्या कुटुंबियांचा दावा

सुशांतसिंह राजपूत यांच्या कुटूंबातील सदस्याने मुंबई पोलिसांना पाठवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप संदेशांचे स्क्रीनशॉट शेअर केले होते, ज्यात त्यांनी पोलिसांना फेब्रुवारीमध्ये कळवले होते की सुशांतचे आयुष्य धोक्यात आहे. शिवाय, त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती त्याला तीन महिन्यांकरिता रिसॉर्टमध्ये घेऊन गेली होती, हेदेखील या कुटुंबाने पूर्वीच स्पष्ट केले होते.

Sushant's family
सुशांतच्या कुटुंबियांचा दावा

By

Published : Aug 4, 2020, 3:22 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूतचे वडिल के. के. सिंह यांनी व्हिडिओ स्टेटमेंट केल्यानंतर काही तासातच सांगितले की त्यांनी मुंबई पोलिसांना आपल्या मुलाच्या जीवाला धोका असल्याचे फेब्रुवारीत कळवले होते. त्यानंतर या दाव्याला बळ देण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेजेसचे स्क्रीनगॅब जारी केले आहे.

सुशांतचे कुटुंब आणि मुंबई पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यात झालेल्या संदेशांच्या देवाण घेवाणीत सुशांतला रिया चक्रवर्तीने रिसॉर्टमध्ये राहायला नेले होते आणि कुटुंबापासून दूर करण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप केला जात आहे.

25 फेब्रुवारीला संदेशांची देवाणघेवाण झाली, ज्यात मुंबई पोलिस अधिकाऱ्यांने नोंद घेतली गेल्याचे उत्तर लिहिले होते. यातील एक मेसेज वाचून दाखवण्यात आला, ''...त्यांची भेट झाल्यानंतर काही दिवसात ती सुशांतच्या घरी राहायला गेली. तो निराश असल्याचे सांगत त्याच्यावर इलाज करण्याच्या बहाण्याने त्याला विमानतळाजवळील रिसॉर्टमध्ये राहायला घेऊन गेली आणि तीन महिने त्याला तिथेच ठेवले. तेव्हापासून ते त्याच्या व्यवसायाचे मॅनेजमेंट करीत आहेत. तेव्हापासून तो खचला होता.''

हेही वाचा - सुशांतच्या आत्महत्येपूर्वी घरात पार्टी झाली नाही, मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

सुशांतला धोका आहे याची त्यांच्यातील अनेक चॅटिंगमुळे कुटुंबियांनी भिती वाटत होती हे अधिकाऱ्यांना सांगितले होते, ''बुधा हा त्याचा डीसीई क्लासमेट त्याच्यासोबत राहात होता. त्याच्याकडून पार्श्वभूमी कळेल. कल्पना अशी होती की तिथे त्याला दुखापत होऊ नये.''

त्याने पुढे लिहिले, ''जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा माझ्या पत्नीला सुशांतने यातून सोडवण्यासाठी सांगितले. तो २-३ दिवस आमच्यासोबत राहिला. त्यानंतर तो त्याच्या शूटिंगसाठी निघून गेला. जेव्हा रियाने त्याच्या सर्व विश्वासू लोकांना काढून आपली माणसे भरली तेव्हा तो पुन्हा खचला.''

दुसर्‍या संदेशात असे लिहिले आहे की, "त्याची तिसरी बहिण दिल्लीत वकिल आहे, ती त्याच्याकडे राहायची आणि नेहमी भेटायला यायची. ती घाबरली होती की, त्याने त्या लोकांसमोर शरणागती पत्करली आहे आणि त्याचा जीव धोक्यात आहे.''

तत्पूर्वी, बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनीही रियाला चौकशीत सहभागी होण्याची विनंती केली होती आणि त्यांनी रियाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना शक्य झाले नाही.

मात्र, रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आज बिहार डीजीपीच्या दाव्याला उत्तर देताना सांगितले की, रिया बेपत्ता नाही आणि तिने आपला जवाब मुंबई पोलिसांकडे नोंदवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details