मुंबई - दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा नवा चित्रपट 'साहो' येत्या ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होतो आहे. तगडी स्टारकास्ट, बिग बजेट आणि थरारक अॅक्शन सीन्समुळे हा चित्रपट सुरूवातीपासून चर्चेत आहेच. मात्र, वारंवार पुढे ढकलली जाणारी रिलीज डेट यामुळेही सिनेरसिकांमध्ये हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे.
'साहो'चे प्रदर्शन पुन्हा लांबणीवर..? - batla house
गेल्या दोन वर्षांपासून प्रभासचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. येत्या 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली होती. मात्र, आता या चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या दोन वर्षांपासून प्रभासचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. येत्या 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली होती. मात्र, आता या चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 15 ऐवजी आता 30 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.
अर्थात हे अधिकृतरित्या जाहीर झाले नसले तरी, शारवानचा 'रानारंगम' आणि अदिवी शेषचा 'इवारु' हे दोन चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होत आहेत. या कारणाने 'साहो'ची रिलीज डेट पुढे ढकलली जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय याच दिवशी अक्षय कुमार आणि विद्या बालनचा 'मिशन मंगल' तर 'जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' हे बॉलिवूड चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहेत.