महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रवीना टंडनने वडिलांच्या जन्मदिनानिमित्य लिहिली भावनिक पोस्ट - raveena post

अभिनेत्री रवीना टंडनने तिचे दिवंगत वडील रवी टंडन यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त 17 फेब्रुवारी रोजी एक पोस्ट शेअर केली आहे.

रवीनाच्या वडिलांचा जन्मदिन
रवीनाच्या वडिलांचा जन्मदिन

By

Published : Feb 17, 2022, 5:35 PM IST

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनने 17 फेब्रुवारी रोजी तिचे दिवंगत वडील रवी टंडन यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या वडिलांची आठवण करीत अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक कौटुंबिक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो बर्थडे सेलिब्रेशनचा आहे.

निर्माते रवी टंडन यांचे ११ फेब्रुवारी रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्या मुंबईतील जुहू येथील घरी वृद्धापकाळाने निधन झाले. रवीना टंडनने इंस्टाग्रामवर याबद्दल माहिती दिली होती.

वडिलांच्या जन्मदिनी एक फोटो शेअर करत रवीना टंडनने लिहिले, 'हॅपी बर्थडे पापा, माझे आयुष्य पुन्हा पूर्वीसारखे होणार नाही. तुम्ही नेहमीच माझ्यासाठी प्रिय असाल. चियर्स'.

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि इंडस्ट्रीतील मित्रांनी रवीनाच्या भावनिक पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आणि शोक व्यक्त केला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, अजय देवगण, माधुरी दीक्षित नेने आणि सोनू सूद यांचा समावेश आहे.

रवी टंडन हे दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक होते. राजेश खन्ना, श्रीदेवी आणि स्मिता पाटील अभिनीत 'नजराना', ऋषी कपूर आणि नीतू कपूर अभिनीत 'खेल खेल में', अमिताभ बच्चन अभिनीत 'मजबूर' आणि संजीव कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला 'अनहोनी' यांसारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.

ते गेल्या काही वर्षांपासून पल्मोनरी फायब्रोसिसने त्रस्त होते आणि नुकतेच श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे त्यांचे निधन झाले.

हेही वाचा -'बप्पी'दांना डिनरनंतर अर्ध्या तासातच आला ह्रदय विकाराचा झटका

ABOUT THE AUTHOR

...view details