मुंबई- बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता तो आपल्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आला आहे. ही पोस्ट दीपिकासाठी नसून रणवीरनं आपल्या बहिणीसाठी शेअर केली आहे. बहिण रितीका भवनानीच्या वाढदिवसानिमित्त रणवीरनं एक फोटो शेअर केला आहे.
रणवीरनं फोटो शेअर करत बहिण रितीकाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिण रितीका भवनानीच्या वाढदिवसानिमित्त रणवीरनं एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा रितीकाच्या बालपणातील फोटो आहे. फोटोत ती समुद्रकिनारी बसलेली दिसत आहे.
हा रितीकाच्या बालपणातील फोटो आहे. फोटोत ती समुद्रकिनारी बसलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करत रणवीरने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, रणवीर अनेकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दीपिकासोबतचे किंवा आगामी चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर करताना दिसतो.
चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास तो लवकरच '८३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९८३ ला भारतानं जिंकलेल्या विश्वकरंडकावर आधारित या चित्रपटात तो कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. अनेकदा तो चित्रपटासाठी प्रशिक्षण घेतानाचे फोटो आणि व्हिडिओही शेअर करताना दिसतो. हा सिनेमा २०२० मध्ये १० एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.