महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

माझी रक्षक, माझी परी; रणवीरनं बहिणीला अशा दिल्या रक्षाबंधनच्या शुभेच्छा - कपिल देव

रणवीरनं बहिण रितीका भवनानीसोबतचा आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यानं म्हटलं, माझी जिवलग मैत्रीण, माझी रक्षक आणि माझी परी...लव यू दीदी. रक्षाबंधनच्या शुभेच्छा.

रणवीरनं बहिणीला अशा दिल्या रक्षाबंधनच्या शुभेच्छा

By

Published : Aug 15, 2019, 11:34 PM IST

मुंबई- आज रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळाला. यात कलाकारही मागे राहिले नाहीत. अनेक कलाकारांनी आपल्या बहिण-भावासाठी खास पोस्ट शेअर केल्या. यात बॉलिवूड बाजीराव रणवीर सिंगचादेखील समावेश आहे.

रणवीरनं बहीण रितीका भवनानीसोबतचा आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यानं म्हटलं, माझी जिवलग मैत्रिण, माझी रक्षक आणि माझी परी...लव यू दीदी. रक्षाबंधनच्या शुभेच्छा. रणवीरच्या या पोस्टवर कमेंट करत अर्जुन कपूरनंही कमेंट केली आहे.

सध्या आपल्या निरनिराळ्या कपड्यांमुळे आणि फॅशनमुळे चर्चेत असलेल्या रणवीरचा या फोटोतील लूक त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच चेहऱ्यावर हसू आणणारा आहे. त्याने या फोटोत प्लेन पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. कामाबद्दल बोलायचं झाल्यास, रणवीर लवकरच ८३ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९८३ मध्ये भारतानं जिकलेल्या विश्वकरंडकावर आधारित या सिनेमात रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details