महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ आणि बलविंदर संधूंने '८३'च्या टीमला दिलं प्रशिक्षण - Mohinder ‘Jimmy’ Amarnath

भारताचे माजी क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ आणि बलविंदर संधू यांनी ८३ च्या सेटवर जाऊन चित्रपटातील कलाकारांची भेट घेतली आहे

८३ च्या सेटवरील फोटो

By

Published : Apr 8, 2019, 3:26 PM IST

मुंबई- दिग्दर्शक कबीर खान हे १९८३ साली झालेल्या क्रिकेट विश्वकरंडकाचा रंजक प्रवास आपल्या '८३' या चित्रपटात उलगडत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग हा कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात रणवीरशिवाय इतरही अनेक कलाकार भूमिका साकारत असून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी क्रिकेटरही चित्रपटाच्या सेटवर पोहोचले आहेत.

भारताचे माजी क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ आणि बलविंदर संधू यांनी ८३ च्या सेटवर जाऊन चित्रपटातील कलाकारांची भेट घेतली आहे. यासोबतच त्यांना प्रशिक्षणही दिलं आहे. यावेळचे सेटवरचे काही फोटो रणवीरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोत रणवीर, मोहिंदर अमरनाथ आणि बलविंदर संधू याच्याशिवाय आदिनाथ कोठारे, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन , जतिन सरना, जीवा, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकारही पाहायला मिळत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details