महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

त्या चाहतीला गुडघ्यावर बसून रणवीरनं दिलं फुल, पाहा व्हिडिओ - रणवीर सिंग

फुल दिल्यानंतर ही महिला रणवीरच्या गालावर किस करते. हा व्हिडिओ पाहता भारताशिवाय लंडनमध्येही रणवीरचे भरपूर चाहते आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

चाहतीला गुडघ्यावर बसून रणवीरनं दिलं फुल

By

Published : Aug 5, 2019, 11:37 AM IST

मुंबई- रणवीर सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणसाठी लंडनमध्ये आहे. ८३ साली भारतानं जिंकलेल्या विश्वचषकावर आधारित या चित्रपटात तो कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच त्याचा लंडनच्या रस्त्यावरील एक व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये तो गुडघ्यावर बसून आपल्या एका वृद्ध चाहतीला गुलाबाचे फुल देताना दिसत आहे. ही महिला व्हिलचेअरवर बसलेली दिसत आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याला चाहत्यांची पसंतीदेखील मिळत आहे.

फुल दिल्यानंतर ही महिला रणवीरच्या गालावर किस करते. हा व्हिडिओ पाहता भारताशिवाय लंडनमध्येही रणवीरचे भरपूरर चाहते आहेत, असं म्हणणं वागगं ठरणार नाही. दरम्यान या महिलेशिवाय त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या इतर चाहत्यांसोबतही रणवीरनं फोटो काढले.

ABOUT THE AUTHOR

...view details