मुंबई- दिग्दर्शक कबीर खान हे १९८३ साली झालेल्या क्रिकेट विश्वकरंडकाचा रंजक प्रवास आपल्या '८३' या चित्रपटात उलगडत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग हा कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. आता रणवीरने कपिल देव यांच्या भूमिकेतील आपला खास फोटो शेअर केला आहे.
कपिल देव यांच्या भूमिकेसाठी रणवीरने केला खास लूक, फोटो केला शेअर - photo
हा फोटो शेअर करत रणवीरने याला 'रेट्रो लूक' असे कॅप्शन दिले आहे. फोटोतील रणवीरचा लूक पाहून हा '८३' चित्रपटातील फोटो असल्याचे बोलले जात आहे.
हा फोटो शेअर करत रणवीरने याला 'रेट्रो लूक' असे कॅप्शन दिले आहे. फोटोतील रणवीरचा लूक पाहून हा '८३' चित्रपटातील फोटो असल्याचे बोलले जात आहे. १९८३चा विश्वचषक भारतीय क्रिकेट टीमने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता हीच कथा या चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटात रणवीरशिवाय आदिनाथ कोठारे, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन , जतिन सरना, जीवा, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकारदेखील झळकणार आहेत.
'८३' चित्रपटात माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सय्यद किरमानी यांच्या भूमिकेत आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी आणि सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे. तर, आदिनाथच्या बरोबरीने चिराग पाटील हा त्याचेच वडील संदिप पाटील यांच्या भूमिकेत दिसणार आहे.