शिमला- हिमाचलची शान म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड क्वीन कंगना रनौतचे बालपणीचे फोटो समोर आले आहेत. पहिल्या फोटोत शाळेतील एका कार्यक्रमात भाग घेतलेली कंगना लाल रंगाच्या साडीत आहे. यात तिने साडीच्या पदराने आपले डोके झाकले आहे.
ट्विटरवर कंगनाचा हा फोटो शेअर करत बहिण रंगोलीने लिहिले, की 'रामायण नाटकातील कंगनाचे छायाचित्र शेअर करत आहे. येथे रामायण सुरू आहे. या नाटकातील पात्रांचा मेकअप आणि वेशभूषा कंगनाने केली होती. ती अवघ्या 13 वर्षांची होती. साडी घालण्यावरुन वडिल तिला खूप रागवायचे. मात्र, कंगनाने कधी त्याची पर्वा केली नाही'.
'रामायण'मधील सीताच्या रुपातील कंगनाचा फोटो शेअर केलेल्या फोटोमध्ये कंगना सीताच्या भूमिकेत दिसत आहे. या फोटोमध्ये कंगानाचे मित्र मैत्रिणीही आहेत. यातील एकाने हनुमान तर एकाने संतांचा पोशाख केला आहे. कंगनाच्या या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले आहे, लहानपणापासूनच कलाकार. तर दुसऱ्याने म्हटलं, , हसऱ्या चेहऱ्यासोबत, सुंदर सीता माता. आम्ही मोठ्या पडद्यावर त्यांना सीतेच्या भूमिकेत पाहू शकतो का?
दुसरा फोटो शेअर करत रंगोली म्हणाली, वडिल कंगनाच्या कॅमेऱ्याच्या वापराबाबत खूप संतापले होते. त्यांनी शर्मा अंकलला कंगनाचे फोटो काढू नका, असे सांगितले. तेव्हा ती १२ वर्षांची होती आणि कॅमेरा विकत घेण्यासाठी तिने १५०० रुपये जमवले होते. याशिवाय रंगोलीने कंगनाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. यासोबतच तिच्या लहानपणीच्या अनेक गोष्टीही सांगितल्या आहेत.