महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'रामप्रसाद की तेरवी' : मरणादारी पोहोचलेल्या आप्त स्वकियांची अनोखी कॉमेडी - veteran actor Seema Pahwa in direction

'रामप्रसाद की तेरवी' या सिनेमाचे एक अफलातून पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आलंय. राम प्रसाद यांचे निधन होते आणि त्यांचा संपूर्ण भार्गव परिवार मरणादारी पोहोचतो. तेरा दिवस ते एकत्र राहताना ते कसे वागतात याची गोष्ट यात पाहायला मिळेल.

'रामप्रसाद की तेरवी'

By

Published : Sep 30, 2019, 11:00 PM IST

मराठीत आलेला 'व्हेन्टीलेटर' चित्रपट तुम्हाला आठवत असेल. याच चित्रपटाची आठवण करून देणारा परंतु वेगळ्या विषयावरचा एक चित्रपट हिंदीमध्ये येतोय. त्याचे शीर्षक आहे 'रामप्रसाद की तेरवी'. या सिनेमाचे एक अफलातून पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आलंय.

राम प्रसाद भार्गवच्या भूमिकेत आहेत दिग्गज अभिनेता नसिरुद्दीन शाह. राम प्रसाद यांचे निधन होते आणि त्यांचा संपूर्ण भार्गव परिवार मरणादारी पोहोचतो. तेरा दिवस ते एकत्र राहताना ते कसे वागतात याची गोष्ट यात पाहायला मिळेल.

या चित्रपटाचे स्टारकास्ट मात्र जबरदस्त आहे. नसिरुद्दीन शाह यांच्यासोबत सुप्रिया पाठक, कोंकणा सेन शर्मा, विक्रांत मस्सी, विनय पाठक, मनोज पाहवा यांच्या यात भूमिका आहेत. सीमा पाहवा यांनी याचे दिग्दर्शन केलंय. मनिष मुंद्रा याचे निर्माते आहेत. जीओ स्टुडिओची निर्मिती असलेला हा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details