मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह एका सोशल कॉमेडी चित्रपटात निर्माता रॉनी स्क्रूवालाच्या आगामी प्रॉडक्शन व्हेंचरमध्ये सहभागी झाली आहे.
रकुल प्रीत हिच्याकडे असलेल्या चित्रपटांची यादी पाहिली तर ती वेगवेगळ्या भूमिका साकारण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसते. आगामी कॉमेडी चित्रपटात रकुल कंडोम परिक्षकाची भूमिका साकारणार आहे. कंडोमचा वापर व्हावा असा चित्रपटाचा उद्देश आहे. योग्य संदेश देण्यासाठी निर्मात्यांनी या बोल्ड विषयात आवश्यक तेवढा विनोद वापरुन समतोल साधण्याचा प्रयत्न केलाय.