महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुशांत प्रकरणी करणी सेनेची सीबीआय चौकशीची मागणी, चौघांना अटक - सुशांत प्रकरणी करणी सेनेची सीबीआय चौकशीची मागणी

रविवारी करणी सेनेच्या सदस्यांचा एक गट पुराना किला रोडवर जमला आणि अभिनेता सुशांतसिंह राजपूतला न्याय मिळावा या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू केली. योगायोग म्हणजे याच करणी सेनेच्या विरोधात सुशांतने पद्मावत चित्रपटाला पाठिंबा दिला होता आणि आपल्या ट्विटर हँडलवरुन 'राजपूत' हे नावदेखील हटवले होते.

Rajput Karni Sena
राजपूत करणी सेना

By

Published : Aug 17, 2020, 2:45 PM IST

नवी दिल्ली - सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) चौकशी करावी या मागणीसाठी राजपूत करणी सेनेने रविवारी इंडिया गेटजवळ आंदोलन केले.

"बॉलिवूड मुर्दाबाद", "सुशांतसिंह राजपूत यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या", "केवळ सीबीआय तपास" आणि "महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद" असे निषेध करणार्‍यांनी फलक लावले होते.

घटनास्थळी दिल्ली पोलीस कर्मचारी उपस्थित होते. नंतर परवानगीशिवाय आंदोलन केल्याच्या आरोपाखाली करणी सेनेच्या चार सदस्यांना अटक करण्यात आली. बादल तंवर, धरमपाल राजपूत, मनीषसिंग राजपूत आणि सूरज पाल अमू अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नंतर या लोकांची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा -दिलीप कुमार यांचे दोन्ही भाऊ कोरोना 'पॉझिटिव्ह', श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं व्हेंटिलेटरवर

योगायोगाने, २०१७-१८ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपट विरोधात करणी सेनेने आंदोलन केले होते. त्यावेळी सुशांतसिंह राजपूतने भन्साळी यांची बाजू घेतली होती आणि चित्रपटाला पाठिंबा दिला होता. इतकेच नाही तर त्याने आपल्या ट्विटरवरुन राजपूत हे नाव त्याने काढून टाकले होते.

विशेष म्हणजे, केंद्रीय अन्वेषण ब्युरोने अभिनेता रिया चक्रवर्ती आणि इतरांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी पाटणा येथून हस्तांतरित करण्याची बिहार सरकारची शिफारस केंद्र सरकारने स्वीकारली होती.

राजपूत यांचे वडील के.के. सिंह यांनी आत्महत्या करण्याच्या कलमाखाली दाखल केलेल्या तक्रारीवरून पाटण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा अभिनेता 14 जून रोजी मुंबईच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details