महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मिथून चक्रवर्तींचा मुलगा नमाशीच्या 'बॅड बॉय'चं चित्रीकरण पूर्ण - तरण आदर्श

मिथून यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती 'बॅड बॉय' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून नुकतंच त्याने या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. या सिनेमातून नमाशीशिवाय निर्माता साजिद कुरेशी यांची मुलगी अमरीनही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

बॅड बॉय'चं चित्रीकरण पूर्ण

By

Published : Aug 1, 2019, 9:22 AM IST

मुंबई- ९० च्या दशकात बॉलिवूडवरती अधिराज्य गाजवणाऱ्या मिथून यांनी आपल्या जबरदस्त अंदाजाने अनेकांना भूरळ घातली. आता यापाठोपाठ त्यांचा मुलगाही प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. मिथून यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती 'बॅड बॉय' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून नुकतंच त्याने या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. ६० दिवसात 'बॅड बॉय' चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे. या सिनेमातून नमाशीशिवाय निर्माता साजिद कुरेशी यांची मुलगी अमरीनही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती साजिद कुरेशी करणार असून राजकुमार संतोषी यांचं दिग्दर्शन असणार आहे. चित्रपटातील गाणी अद्याप चित्रीत झाली नाही. मुंबई आणि बंगळुरूमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण केलं गेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details