मुंबई - अभिनेता तसेच कथ्थक गुरु असलेले वीरु कृष्णनन यांचे ७ सप्टेंबरला निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉलिवूड कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीने तिच्या ट्विटवर अकाऊंटवरुन वीरु यांच्या निधनाची माहिती दिली होती.
वीरु हे सुप्रसिद्ध कथ्थक गुरु होते. कॅटरिना कैफ, प्रियांका चोप्रा, लारा दत्ता, अथिया शेट्टी यांसारख्या अभिनेत्रींना त्यांनी नृत्य शिकवले आहे.
हेही वाचा-धर्मेंद्र अन् लिना चंदावरकर यांच्यासोबत केलेल्या लिपलॉकमुळे चर्चेत आले होते राम जेठमलानी
वीरु कृष्णनन यांनी आमिर खानसोबत 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटात भूमिका साकारली होती. याशिवाय, 'इश्क', 'अकेले हम अकेले तुम' या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.
टीव्ही स्टार करणवीर बोहरा यानेही इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन वीरु यांना आदरांजली वाहिली आहे.
टीव्ही स्टार करणवीर बोहरा यानेही इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन वीरु यांना आदरांजली वाहिली आहे.
प्रियांका चोप्रा, लारा दत्ता यांनीही ट्विटरवरुन त्यांच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली आहे.
हेही वाचा-झायरा वसिमच्या 'या' शेवटच्या चित्रपटाचं टोरान्टोमध्ये होणार स्क्रिनिंग