मुंबई - राज कुंद्रा शिल्पा शेट्टीसाठीच्या आपल्या भावना अनेकदा सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसतो. या कपलच्या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंतीही मिळत असते. आता राज कुंद्राने शिल्पासोबत आपला आणखी एक फोटो शेअर करत त्याला खास रोमँटीक कॅप्शनही दिले आहे.
तर मी आयुष्यभरासाठी तुला मिठीत घेईल, राज कुंद्राची शिल्पासाठी रोमँटीक पोस्ट - सोशल मीडिया
अशा व्यक्तीसोबत लग्न करू नका ज्याच्यासोबत तुम्हाला राहायचं आहे. अशा व्यक्तीसोबत लग्न करा ज्याच्याशिवाय तुम्ही राहू शकतं नाही, असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

माझं तुझ्यावर असलेलं प्रेम हा असा प्रवास आहे, जो नेहमीच सुरू राहील आणि त्याचा कधीही शेवट होणार नाही. एक मिठी जर हे सिद्ध करत असेल, की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, तर मी आयुष्यभरासाठी तुला माझ्या मिठीत ठेवील, असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वीच राजने शिल्पासोबतचा स्पेनला जातानाचा विमानातील फोटो शेअर केला होता. माझ्या गर्लफ्रेंडसोबत स्पेनला रवाना, काही वेळ एकमेकांसोबत घालवण्यासाठी. लोक खरंच म्हणतात, अशा व्यक्तीसोबत लग्न करू नका ज्याच्यासोबत तुम्हाला राहायचं आहे. अशा व्यक्तीसोबत लग्न करा ज्याच्याशिवाय तुम्ही राहू शकतं नाही, असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.