मुंबई- प्रसिद्ध रॅपर हनी सिंग याला पंजाबच्या महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. हनी सिंगने आपल्या मखना या गाण्यात स्त्रियांबद्दल अशोभनीय भाषा वापरली असल्याचे यात म्हटले गेले आहे. लवकरच याविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचे पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्ष मनीषा गुलाटी यांनी म्हटले आहे.
हनी सिंगला महिला आयोगाची नोटीस, स्त्रियांबद्दल अशोभनीय भाषा वापरल्याचा आरोप - sent notice
महिला आयोगाने हनी सिंगला नोटीस पाठवली आहे. हनी सिंगने आपल्या मखना या गाण्यात स्त्रियांबद्दल अशोभनीय भाषा वापरली असल्याचे यात म्हटले गेले आहे.
यासोबतच राज्य सरकारही याविरोधात लवकरच कारवाई करेल, अशी अपेक्षा गुलाटी यांनी व्यक्त केली आहे. यासंबंधात १२ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याची विनंती आम्ही पोलिसांनी केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महिलांविरोधी आक्षेपार्ह शब्द असलेलं हे गाणं पंजाब राज्यात बॅन केलं जावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान हनी सिंगच्या मखना गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. केवळ महिनाभरातच हे गाणं 100 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले होते. या गाण्यात त्याच्यासोबत नेहा कक्करसुद्धा पाहायला मिळाली होती. आता महिला आयोगाच्या या नोटीसवर हनी सिंग काय प्रतिक्रिया देणारं तसंच हे गाणं बॅन केलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.